Google Year in Search 2021: दरवर्षीप्रमाणे Google सर्च इंजनने यावर्षीही सर्वाधिक सर्च झालेल्या ट्रेंडिंग गोष्टींची यादी जाहीर केली आहे. गुगल दरवर्षी वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती, चित्रपट यासह विविध गोष्टींची यादी जाहीर करते. या रिझल्टमध्ये २०२१ मध्ये भारतीय व्यक्तींनी गुगलवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या ते समोर आलं आहे. विशेष म्हणजे २०२१ च्या अखेरीस अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात 'शेरशाह' (shershaah) आणि 'जय भीम' (jai bhim) या चित्रपटांची बॉक्स ऑफिससह संपूर्ण देशवासीयांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे गुगल सर्चमध्येही या दोघांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं.
नुकतंच गुगलने २०२१ या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. गुगलने जाहीर केलेल्या यादीत 'शेरशाह' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. तर 'जय भीम' प्रथम क्रमांकावर आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याची मुख्य भूमिका असलेल्या 'जय भी'म या चित्रपटाचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली. चित्रपटाच्या कथानकापासून ते दिग्दर्शनापर्यंत अनेक गोष्टींसाठी हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यामुळे गुगलवरदेखील तो बऱ्याच वेळा सर्च केला गेला. याच कारणास्तव 'जय भीम' हा चित्रपट टॉप १० चित्रपटांमध्ये प्रथम स्थानावर आहे. तर त्याच्या खालोखाल कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' हा चित्रपट दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकला होता.
दरम्यान, 'जय भीम' आणि 'शेरशाह' या दोन्ही चित्रपटांना गुगल सर्चसह IMDB वरही भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाल्याचं सांगण्यात येतं.
गुगल सर्चमध्ये 'या १० चित्रपटांना मिळालं स्थान
'जय भीम', 'शेरशाह', 'राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’, 'बेल बॉटम', 'सूर्यवंशी', 'दृश्यम 2', 'मास्टर', 'भूज' हे चित्रपट टॉप १० यादीत आहेत.