Join us

Akshay Kumar: भारताचं नागरिकत्व मिळालं! आता निवडणुकही लढवणार? अक्षय कुमारने दिलं होतं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 5:17 PM

Akshay Kumar: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी पुन्हा एकदा भारताचं नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली. अक्षय कुमारने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी पुन्हा एकदा भारताचं नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली. अक्षय कुमारने ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मन आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. अक्षय कुमारला भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर आता तो राजकारणात उतरणार का, तसेच २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

अक्षय कुमारला एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेली जवळीक आणि राजकारणात येण्याबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा अक्षय कुमार म्हणाला होता की, माझी राजकारणात येण्याची इच्छा नाही आहे. मी चित्रपटांमध्ये काम करू इच्छितो. देशासाठी एक नागरिक जसं करतो. तसं मला करायचं आहे. मला अशी कुठली जागा दिसली, जिथे मी काही करू शकत असेन. पण मला जाणं शक्य नसेल. तर तिथे मी पैसे पाठवून जेवढं माझ्यानं होईल. तेवढं करतो. मात्र मला राजकारणात जायचं नाही. मी चित्रपटांमध्ये काम करूनच आनंदी आहे.

अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व होतं. त्यावरून त्याच्यावर टीकाही झाली होती. सोशल मीडियावर अक्षय कुमारला वारंवार ट्रोल केलं जात होतं. अक्षय कुमारने आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जेव्हा लोक माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेव्हा मला वाईट वाटतं. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडभारतराजकारण