आपल्या निखळ हास्यामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित (madhuri dixit). ९० चा काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा आज अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एकेकाळी तिच्या सौंदर्यावर चाहत्यांसह अनेक दिग्गज अभिनेताही भाळले होते. त्यामुळेच माधुरीसोबत लग्न व्हावं अशी अनेक अभिनेत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे माधुरीसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या अभिनेत्यांच्या यादीत गोविंदाचाही (govinda) समावेश असल्याचं म्हटलं जातं. खुद्द गोविंदानेच एका कार्यक्रमात याविषयी भाष्य केलं आहे. 'आपण माधुरीला लग्नाची मागणी घातली होती', असं तो म्हणाला होता.
सध्या सोशल मीडियावर माधुरी आणि गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदाने माधुरीला लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु, तिने काहीच रिप्लाय दिला नाही, असं तो म्हणाला. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 'डान्स दीवाने'च्या सेटवरील असल्याचं दिसून येत आहे. या कार्यक्रमात गोविंदाने गेस्ट जज म्हणून हजेरी लावली होती.
"माझ्यासारखा माधुरीचा दुसरा कोणताच चाहता असू शकत नाही. कदाचित तुम्ही लोक फक्त चर्चाचं करत असाल. पण, मी आणि अमिताभ बच्चन जी आम्ही दोघांनी माधुरीला विचारलं होतं, की तू लग्न का करत नाही? पण, माधुरीने आमच्या दोघांकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर तिने आम्हाला नाही नाही म्हणत थेट नेनेंसोबत लग्न केलं", असं गोविंदा म्हणाला. विशेष म्हणजे गोविंदाने खरोखर माधुरीला लग्नाची मागणी घातली नव्हती. तर केवळ एक मस्करी म्हणून हा विनोद केला होता. परंतु, गोविंदाचं हे वाक्य ऐकत असताना माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रिअॅक्शन होती. तिने यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, न रागावता ती हा विनोद एन्जॉय करत होती. त्यामुळे या मंचावर गोविंदाचा विनोद ऐकून ती खळखळून हसत होती.
दरम्यान, माधुरीने 'अबोध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. परंतु, माधुरीने तिच्या सौंदर्यामुळे अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर माधुरीचे एकामागून एक 'तेजाब’, ‘दिल’, ‘जमाई राजा, ‘महा-संग्राम’, ‘हम आपके हैं कौन’ असे चित्रपट सुपरहिट ठरले.