Join us

गोविंदाचा घटस्फोट होणार नाही! अभिनेत्याच्या वकिलाने दिली माहिती; म्हणाले, "६ महिन्यांपूर्वीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:49 IST

गोविंदाच्या वकिलांनी सांगितलं नेमकं सत्य

कालपासून अभिनेता गोविंदाच्याघटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) यांचा ३८ वर्षांचा संसार मोडणार अशा बातम्या पसरल्या. तसंच गोविंदाचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं गेलं. सुनिताने स्वत:च गोविंदाच्या अफेअरवर भाष्य केलं होतं. तसंच हे नवरा बायको वेगवेगळ्या घरात राहत होते असाही खुलासा झाला. पण आता गोविंदाच्या वकिलांनी सत्य काय ते सांगितलं आहे. 

घटस्फोट होणार नाही! काय म्हणाले वकील?

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अद्याप गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. पण आता गोविंदाचे वकील आणि फॅमिली फ्रेंड ललित बिंदल यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, "गोविंदाची पत्नी सुनिताने सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र नंतर त्यांच्यात गोष्टी आपोआप सुधारत गेल्या. आता ते दोघंही पुन्हा सोबत आले आहेत आणि त्यांचं नातं आणखी घट्ट झालं आहे."

वकिलांच्या माहितीनंतर चर्चांना पूर्णविराम

गोविंदाच्या वकिलांनी केलेल्या या खुलाश्यानंतर आता गोविंदा आणि सुनिता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. तरी दोघांकडून अद्याप अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. गोविंदा सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारित व्यस्त आहे. दोघांच्या लग्नाला ३७ वर्ष झाली आहेत. त्यांना टीना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे. 

टॅग्स :गोविंदाघटस्फोटबॉलिवूडपरिवार