Join us

Birthday Special: एका चुकीमुळे गोविंदाच्या करिअरला लागली उतरती कळा, आजही त्या गोष्टीचा होतो पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:14 PM

इंडस्ट्रीत डेविड धवनसह  गोविंदाचा रंगलेला वाद सा-यांनाच माहिती आहे. गोविंदानने डेव्हिड धवन यांच्या विविध सिनेमात काम केले आहे.

बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा. आपला डान्स,कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनय याने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने सा-यांची मनं जिंकली. त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला.

 

विरारचा छोरा अशी ओळख असणा-या गोविंदाचं आयुष्य मुंबापुरीतच गेलंय.  इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचं रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. त्याच्या जीवनाविषयी ब-याच गोष्टी कायमच ऐकायला मिळतात. मात्र गोविंदाच्या आयुष्याविषयी काही गोष्टी अजूनही समोर आलेल्या नाहीत.

अनेकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या घराणेशाही हा चर्चा रंगतो. नेपोटीझमला चांगले चांगले कलाकार बळी पडले आहेत. अनेक उदाहणे आहेत. नेपोटीझमचा फटका हा गोविंदालाही बसला होता. दिलेल्या मुलाखतीत अनेकदा गोविंदाने यावर वाचा फोडली होती.गोविंदाने सुरूवातीपासून स्वतःच्या नियमांवर काम केले आणि त्याच ताकदीवर यशही मिळवले. इतके सुपरहिट सिनेमे देणारा गोविंदाचे दर्शन मात्र सिनेमात घडत नाहीत.

 जर तो एखाद्या मोठ्या  ग्रुपशी संबंधित असला असता तर  त्याला चांगले सिनेमेही मिळाले असते. दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने म्हटले होते, बॉलिवूड एक मोठे कुटुंबसारखे आहे. सगळ्यांनुसार आपण वागले तर तुम्ही सर्वांसाठी चांगले बनता. तुम्हाला कामही मिळतात.

इंडस्ट्रीत डेविड धवनसह  गोविंदाचा रंगलेला वाद सा-यांनाच माहिती आहे. गोविंदानने डेव्हिड धवन यांच्या विविध सिनेमात काम केले आहे. मात्र आता त्याच दिग्दर्शकासोबत काम करण्यास गोविंदा तयार नाही. जसे काम इतर अभिनेत्यांना मिळत तसे काम गोविंदाला आता मिळत नाही.

गोविंदाप्रमाणेच त्यांच्या लेकीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र तिला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही. मात्र आता सगळीकडे चर्चा आहे ती गोविंदाच्या मुलाची. गोविंदाच्या मुलाचे नाव आहे यशवर्धन आहुजा. आपल्या वडिलांप्रमाणेच यशवर्धनसुद्धा स्टायलिश आणि हॅडसम आहे.

यशवर्धनने लंडनच्या मेट स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केला आहे. मात्र यशवर्धनला सिनेनिर्मितीमध्ये विशेष आवड आहे. यशवर्धन बॉलीवुडच्या विविध इव्हेंट्सलाही हजर असतो. इम्तियाज अली यशवर्धनचा सर्वात आवडीचा दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक आहे.  

टॅग्स :गोविंदा