Join us

VIDEO : बर्थडे पार्टीत गोविंदा आणि गणेश आचार्यचा धमाकेदार डान्स, या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लावली हजेरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 09:03 IST

यादरम्यान गोविंदाने आपल्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्याचं घर पार्टीसाठी सजवण्यात आलं होतं.

सोमवारी २१ डिसेंबरला अभिनेता गोविंदाने आपला  वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची पत्नी सुनीता आहुजाने मिडनाइट बर्थडे सेलिब्रेशन ऑर्गनाइज केली होती. या पार्टीला गोविंदाचे जवळचे मित्र आणि काही सेलिब्रिटीही आले होते. 

यादरम्यान गोविंदाने आपल्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्याचं घर पार्टीसाठी सजवण्यात आलं होतं. सेलिब्रेशनबाबत गोविंदाने सांगितले की, 'माझ्या पत्नीने माझ्यासाठी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं आहे ज्यात माझ्या सर्वच मित्रांना बोलवण्यात आलं होतं. आम्ही  खूप एन्जॉय केलं'.

गोविंदाने पुढे सांगितले की, राजपाल यादव, रवि किशन, अरमान कोहली, गणेश आचार्य, शक्ति कपूर पार्टीत आले होते. माझ्या वेगवेगळ्या गाण्यांवर आम्ही डान्स केला. आम्ही तेव्हाच थांबलो जेव्हा सकाळी ६ वाजता दुधवाल्याने बेल वाजवली.

२०२० संपणार आहे. अशात आता गोविंदाला आशा आहे की, येणारं वर्ष चांगलं असेल. तो म्हणाला की, 'मी देवाला प्रार्थना करतो की, जगातून आता सुरू असलेली महामारी निघून जावी आणि आपण सगळे २०२१ मध्ये नॉर्मल होऊ'. 

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसोशल मीडियागणेश आचार्य