Join us

'मी हिरो शिवसेनेचा' प्रचारसभेत गोविंदाची डायलॉगबाजी, सुहास कांदेसाठी अभिनेता मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 1:44 PM

यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची  (Maharashtra Assembly Election 2024) धामधुम पाहायला मिळत आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. नाशिकमधील नांदगाव या मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे (Suhas Kande) हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी थेट 'हिरो नंबर वन' गोविंदा (Govinda) मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. 

मनमाडमध्ये सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी सोमवारी गोविंदाचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. एकात्मता चौकातून रॅलीला सुरुवात झाली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदाने बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, 'बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडिल यांचे चांगले संबंध होते. मला बघण्यासाठी ते घरी आले होते. तेव्हापासून माझे शिवसेनेशी संबंध आहे. चित्रपटसृष्ट्रीत येण्याआधीपासूनचे हे संबंध आहेत. चित्रपटसृष्ट्रीत तर मी नंतर आलो. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन सिनेमे केले आहेत. मी हिरो तर शिवसेनेचा आहे", अशी डॉयलॉगबाजी गोविंदाने केली. 

गोविंदा म्हणाला, "बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले आहेत.  महिला सबलीकरण असो किंवा महाराष्ट्रातील विकासात्मक बदल हा महायुती सरकारमुळे झाला आहे". यासोबतच गोविंदाने सुहास कांदे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गोविंदा हा सर्वंच महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचात करताना दिसून येत आहे. सुहास कांदे यांच्यापुर्वी गोविंदा नांदेडमध्येही प्रचार करताना दिसला होता.  

टॅग्स :गोविंदामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४