Join us

उज्जैनला पोहचला गोविंदा, महाकाल मंदिरात केली पूजा, सोबत दिसले नाहीत पत्नी-मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:49 IST

Actor Govinda : अभिनेता आणि राजकारणी बनलेल्या गोविंदाने नुकतेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले.

अभिनेता आणि राजकारणी बनलेल्या गोविंदा(Actor Govinda)ने नुकतेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्याने पिवळा कुर्ता परिधान केला होता. अभिनेत्याने पारंपारिक विधी केले. गोविंदा शंकराचे वाहन नंदीच्या मूर्तीला जल अर्पण करताना दिसला. त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधत धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर आनंद आणि आत्मिक समाधान व्यक्त केले. गोविंदासोबत त्याची पत्नी सुनीता किंवा इतर कुटुंबातील सदस्य दिसले नाहीत.

याआधी गोविंदाची पत्नी सुनीता तिचा मुलगा यशवर्धनसोबत एका कार्यक्रमात दिसली. तिथे पापाराझींनी तिला अभिनेत्याबद्दल विचारल्यावर सुनीताने चेहऱ्यावर वेगळे एक्सप्रेशन देत म्हणाली की, 'काय?' यानंतर ती तिच्याच शैलीत हसायला लागली.

घटस्फोटाची चर्चागोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाची अलिकडेच जोरदार चर्चा होताना दिसत होती. सुनीता वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अनेक विधाने करत होती. तिने सांगितले होते की, ती वेगळ्या घरात राहते. मात्र, नंतर त्याला गोविंदापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असेही सांगितले.

अर्जुन रामपालनेही महाकाल मंदिरात घेतले दर्शनगोविंदापूर्वी अभिनेता अर्जुन रामपालने महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते. अर्जुनने भस्म आरतीमध्ये भाग घेतला होता. पांढरा शर्ट परिधान केलेल्या अर्जुनने 'महाकाल' असे लिहिलेले पारंपारिक काळ्या रंगाचे स्टोल अंगावर घेतले होते. 

टॅग्स :गोविंदा