Join us

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:35 IST

गोविदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिनेता गोविंदाच्या (Govinda)  पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागली आहे. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पहाटेच तो कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाला. मात्र तेव्हाच रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागली. त्याला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गोविंदाच्या मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार,  गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता.  तयार होत असताना त्याने त्याची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली.  रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या तो रुग्णालयातच उपचार घेत आहे.

टॅग्स :गोविंदाहॉस्पिटलबॉलिवूडमुंबई