Join us

'मुघलांचं या देशासाठी मोठं योगदान, ते राष्ट्र निर्माते, तुम्ही त्यांना रिफ्युजी म्हणू शकता', नसिरुद्दीन शाहांचं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:06 AM

Naseeruddin Shah News: मुघलांनी या देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते इथे राष्ट्र निर्माणासाठी आले होते, त्यांना तुम्ही रिफ्युजी म्हणू शकता, असं विधान एका कार्यक्रमामध्ये नसिरुद्दीन शाहांनी केलं. आता त्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.

हरिद्वार - ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाहा यांच्या काही विधानांमुळे वाद होत असतो. दरम्यान, नसिरुद्दीन शाहांनी पुन्हा एकदा असं विधान केलं आहे, ज्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. मुघलांनी या देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते इथे राष्ट्र निर्माणासाठी आले होते, त्यांना तुम्ही रिफ्युजी म्हणू शकता, असं विधान एका कार्यक्रमामध्ये नसिरुद्दीन शाहांनी केलं. आता त्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.

नसिरुद्दीन शाह म्हणाले की, मुघलांनी केलेला कथित अत्याचार वेळोवेळी ठळकपणे मांडला जातो. मात्र आम्ही हे का विसरतो की मुघल हे तेच लोक आहेत ज्यांनी या देशासाठी आपलं योगदान दिलं आहे, मुघल ते लोक आहेत ज्यांनी देशामध्ये स्थायी स्मारकांची निर्मिती केली. त्यांच्या संस्कृतीमध्ये नाचगाणे, चित्रकारी, साहित्य आहे. मुघल येथे आपले राष्ट्र निर्माण करण्यासाठी आले होते. तुम्ही त्यांना वाटल्याच रिफ्युजी म्हणू शकता.

दरम्यान, नसिरुद्दीन शाहांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच नेटीझन्स त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युझरने लिहिले की, मुघलांच्या आधी आमच्याकडे कुठलीही वस्तुकला नव्हती? मुघर रिफ्युजी म्हणून आले आणि त्यांनी आमच्या वस्तूकलेला योग्य बनवले. मुघलांनी भारतामध्ये एवढ्या सुंदर मंदिरांची निर्मिती केली, हे आम्हाला माहितच नव्हते. अन्य एका युझरने लिहिले की, वास्तू, संस्कृती, नृत्य, संगीत, साहित्य हे मुघलांचे योगदान नाही आहे, ते देशात आधीपासूनच होते. जर हे सर्व मुघलांचे आहे, तर ते अफगाणिस्तानमध्ये का नाही? असा सवालही या युझरने उपस्थित केला आहे.  

टॅग्स :नसिरुद्दीन शाहभारतइतिहासबॉलिवूड