गेल्या वर्षभरात अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. या चौकशी दरम्यान ड्रग्स प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. आता ती हळूहळू पुर्ववत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते आहे. आता तिने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
१४ जूनला सुशांत सिंग राजपूतची पहिली पुण्यतिथी आहे. त्यापूर्वीच रिया चक्रवर्तीची ही पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये रियाने लिहिले आहे की, मोठ्या वेदनेतून मोठी ताकद मिळते. तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागेल. तिथे थांबावे लागेल. प्रेम, रिया.
तर रियाच्या एका चाहत्याने लिहिले की, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, तुम्हाला जास्त ताकद मिळो. तर आणकी एका फॅनने म्हटले की, देवाचा आशीर्वाद असो. विनाकारण तुम्हाला खूप सहन करावे लागले. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ताकद देवो.