Join us

मनीष पॉलने केले हे उत्कृष्ट काम, वाचून तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 6:50 PM

बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलने केलेली कामगिरी ऐकून तुम्हाला नक्कीच त्याचे कौतूक वाटेल.

बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलने केलेली कामगिरी ऐकून तुम्हाला नक्कीच त्याचे कौतूक वाटेल. मनीष नुकताच लखनऊमध्ये एका कार्यक्रमात गेला होता. तिथे दृष्टीहिन खेळांडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेला मनीष पॉलने हजेरी लावली होती. इतकेच नाही तर दृष्टीहिन क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी मनीषने प्रोत्साहन दिले.

डॉ. शंकुतला मिश्रा स्मृती सेवा संस्था संस्थान आणि क्रिकेट असोसिएशन फॉर हॅण्डीकॅप्ड मिळून दरवर्षी दृष्टीहिन खेळांडूंसाठी आंतरराज्य स्पर्धेचे आयोजन करत असते. या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सेलिब्रेटी हजेरी लावतात. यंदा या स्पर्धेला मनीष पॉलने हजेरी लावली होती. या स्पर्धेदरम्यान मनीषने त्याचे किस्से सांगितले व स्पर्धकांना आपल्या विनोदांवर खूप हसविले. तसेच त्यांचे कौतूक करीत त्यांना प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर मनीषने डोळ्यावर पट्टी बांधून क्रिकेट खेळण्याचाही प्रयत्न केला.

याबद्दल मनीष म्हणाला की, हे क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षाही खूप कठीण आहे. हे दृष्टीहिन खेळाडू ज्याप्रमाणे खेळत होते ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. हे क्रिकेट सोपे नाही आणि हे लोक खूप छान क्रिकेट खेळतात. सगळेच छान आहेत. त्यांना भेटल्याचा अनुभव खूप छान होता. त्यांच्यासोबत मी खूप मज्जा केली. 

मनीषने खेळाडूंना सांगितलं की, तुम्ही क्रिकेट खेळताना जो आनंद घेता तो खूप कौतुकास्पद आहे. त्यासाठी तुम्हाला सलाम.

टॅग्स :मनीष पॉल