रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले. होय, ‘गली बॉय’ हा रणवीरचा तिसरा आणि आलियाचा पहिला सर्वात मोठा ओपनर ठरला. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘गली बॉय’ ने पहिल्या दिवशी १८.७० कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तब्बल ३३५० स्क्रिन्सवर झळकलेला ‘गली बॉय’ शुक्रवारी प्रदर्शित न करता ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:32 IST
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले.
Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!
ठळक मुद्दे आलियाच्या फिल्मी करिअरमध्ये ‘गली बॉय’ सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. म्हणजेच ‘गली बॉय’ पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा आलियाचा पहिला चित्रपट ठरला आहे.