Join us  

'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकची रणबीर कपूरला ऑफर, आणखी दोन कलाकारही रांगेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:04 AM

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून रणबीर कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'रॉकस्टार', 'ॲनिमल' सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून रणबीर कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.  आजवर विविध विषयांवर आधारित वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न रणबीर कपूर करत असतो. अशात सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या बायोपिकच्या लाटेत रणबीर कपूरलाही अशीच एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर? नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद होईल. अशीच बातमी सध्या समोर येत आहे. 

T Seriesचे फाऊंडर गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरनेच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. भूषण कुमार हे गुलशन कुमार यांचा बायोपिक करणार आहेत. 'मोगल' असे या बायोपिकचे नाव असणार आहे.  गुलशन कुमार यांची हत्या भर दिवसा अंधेरीतील एका मंदिराच्या बाहेर झाली होती. गुलशन कुमार यांचे प्रतिस्पर्धी संगीतकार नदीम हे या हत्येत आरोपी होते. या हत्येमुळे कशाप्रकारे व्यवसायिक, सेलिब्रेटी यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात आहेत, हे समोर आले होते. 

गुलशन यांच्या भुमिकेत रणबीरचा विचार ते करत आहेत. यासंदर्भात रणबीरशी चर्चादेखील सुरू आहे. रणबीरने या आधी संजू सारख्या बायोपिकमधून आपला अभिनय सिद्ध केलेला आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने तारखा मिळाल्या नाही तर भूषण कुमार हे आयुष्मान खुराना आणि वरुण धवन यांच्याशी चर्चा करणार आहेत.  

गुलशन कुमार यांच्या बायोपिकची घोषणा मार्च 2017 मध्ये करण्यात आली होती. सुभाष कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. मात्र, काही मतभेदांमुळे अक्षयने वेगळा झाला. यानंतर आमिर खानने हा सिनेमा करण्याची इच्छा दर्शवली. पण MeToo मोहिमेदरम्यान सुभाष यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर आमिरनेही सिनेमा सोडला. आता गुलशन कुमार यांच्या भूमिकेत रणबीरला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरगुलशन कुमार आयुषमान खुराणावरूण धवनभुषण कुमार