Join us

करण जोहरची घोषणा Netflixवर रिलीज होणार गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 12:17 IST

करणने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा 'गुंजन सक्सेना' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचे फिल्ममेकर करण जोहरने सांगितले आहे. करणने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करताना लिहिले, तिच्या प्रेरणादायी प्रवासाने इतिहास रचला. ही तिची गोष्ट आहे. ''गुंजन सक्सेना - द करगिल गर्ल, लवकरच नेटफ्लिक्स''वर.

करण जोहरने शेअर केलेल्या या व्हिडीओत जान्हवी आपल्या आवाजातून गुंजन सक्सेनाबाबत सांगतेय, ''गुंजन सक्सेना, लखनऊमध्ये राहणारी छोटीशी मुलगी आहे. जिचे स्वप्न पायलट व्हायचे असते. समाज मुलींना गाडू चालवू देत नाहीत, तो गुंजनला विमान उडवू देईल का?, तिला कुणी जगाची पर्वा होती पण, फक्त आपल्या वडिलांवर विश्वास होता. जे म्हणायचे विमान मुलांना उडवले किंवा मुलीने त्याला पायलटच म्हणतात.'' 

गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल' हा चित्रपट इंडियन एअरफोर्सची पायलट गुंजन शर्माच्या जीवनावर आधारीत आहे. गुंजन शर्माने कारगिल युद्धाच्यावेळी एअरफोर्सचं विमान उडवलं होतं. या चित्रपटात जान्हवी व पंकज त्रिपाठी शिवाय अंगद बेदी, विनीत कुमार व मानव विज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.   

टॅग्स :गुंजन सक्सेना द कारगिल गर्लकरण जोहरजान्हवी कपूर