Join us

कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिकेच्या आत्याचे झाले निधन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:06 PM

एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या एका नातलगाचे कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे निधन झाले असून तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देदिग्दर्शक गुरिंदर चड्ढाच्या आत्याचे रविवारी कोरोना व्हायरसने निधन झाले असून गुरिंदर यांनीच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. त्यांच्या निधनाच्यावेळी गुरिंदर यांच्या कुटुंबियातील कोणीच त्यांच्या जवळ नव्हते.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या एका नातलगाचे कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे निधन झाले असून तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे.

दिग्दर्शक गुरिंदर चड्ढाच्या आत्याचे रविवारी कोरोना व्हायरसने निधन झाले असून गुरिंदर यांनीच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. त्यांच्या निधनाच्यावेळी गुरिंदर यांच्या कुटुंबियातील कोणीच त्यांच्या जवळ नव्हते. त्यांच्या आत्या या इग्लंडच्या रुग्णालयात होत्या. त्यांनी सोशल मीडियाद्वारे रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफचे आभार मानले आहेत. गुरिंदर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोरोना व्हायरसमुळे माझ्या आत्याचे नुकतेच निधन झाले. माझी ही आत्या माझ्या वडिलांची सगळ्यात लहान बहीण होती. आम्हाला सगळ्यात जास्त दुःख होत आहे की, त्यांच्या शेवटच्या क्षणात आमच्यापैकी कोणीच त्यांच्यासोबत नव्हते. शेवटी दोन नर्सेस त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी त्यांना शिखाच्या प्रार्थना देखील ऐकवल्या होत्या...

गुरिंदर चड्ढा यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. बेंड इट लाइक बेकहम, ब्राइड एंड प्रेज्यूडियस आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या