बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सर्वांचा हिरो बनला आहे. अगदी रिअल लाइफ हिरो. लॉकडाऊनकाळात ठिकठिकाणी अडकलेल्या हजारो मजुरांना सोनूने मदतीचा हात दिला. बससेवा सुरु करून या मजुरांची पायपीट थांबवली. केरळमध्ये अडकलेल्या काही मुलींसाठी तर त्याने चक्क फ्लाइटची व्यवस्था केली. साहजिकच सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही त्याचे मनापासून कौतुक करत आहेत. बॉलिवूड सिंगर गुरु रंधावा त्यापैकीच एक.
गुरूने सोनूचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनू शहीद भगतसिंगच्या लूकमध्ये आहे. ‘पाजी, तुला खूप सारे प्रेम आणि आदर. तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,’ असे हा फोटो शेअर करताना गुरु रंधावाने लिहिले.
गुरु रंधावाचे हे ट्विट तुफान व्हायरल होतेय़ या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा जणू पाऊस पडतोय. एका युजरने तर सोनूला ‘2020 चा भगतसिंग’ संबोधले आहे. तर अन्य एका युजरने यावर कमेंट करताना सोनूबद्दल बोलायला शब्दही कमी पडतील, असे लिहिले आहे.
2002 साली ‘शहीद ए आजम’ या सिनेमाद्वारे सोनू सूदचा बॉलिवूड डेब्यू झाला होता. या सिनेमात त्याने शहीद भगतसिंगची भूमिका साकारली होती. हा सोनूचा पहिला हिंदी सिनेमा होता. याच चित्रपटातील फोटो गुरूने शेअर केला आहे.तूर्तास सोनू सूद सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. गुगल ट्रेंडमध्येही तो आघाडीवर असून आमिर खान, सलमान खान, शाहरूख खान यांनाही त्याने मागे टाकले आहे. सोनूचे मूळ गाव काय, त्याचे चित्रपट, त्याने मदतीसाठी जाहीर केलेला ट्रोल फ्री नंबर, त्याने चालवलेले मदतकार्य असे काय काय लोक सर्च करत आहेत.