Well known Pakistani actor Sajid Hasan recently decided to have a hair transplant done -- on the insistence of a friend who did the operation - see the result(Warning: Graphic) pic.twitter.com/qraZCVvUCr— omar r quraishi (@omar_quraishi) February 3, 2018
ओमर आर कुरेशीच्या टिष्ट्वटर हँडलवरून साजिदचा एक व्हिडिओ शेअर केला गेलाय. ४३ सेकंदांच्या या व्हिडिओत साजिद आपली आपबीती सांगतोय. या व्हिडिओत त्याच्या डोक्यावरची जखम स्पष्ट दिसतेय. ही जखम बरीच खोल आणि गंभीर स्वरूपाची दिसतेय. चुकीचा उपचार आणि डॉक्टरचा निष्काळजीपणा यामुळे माझ्यावर ही वेळ ओढवली. याबद्दल मी कधी विचारही करू शकत नाही. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या जखमेमुळे काम करणे आणि ते मिळवणेही कठीण झाले आहे, असे साजिदने यात सांगितले आहे. शिवाय हेअर ट्रान्सप्लांट करायचे असल्यास तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. साजिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. आत्तापर्यंत दोन लाखांवर लोकांनी त्याचा हा व्हिडिओ पाहिला आहे.अनेकांनी साजिदसोबत झालेला प्रकार गंभीर असल्याचे सांगत यावर संताप व्यक्त केला आहे.साजिदने सलाखे, पहला पहला प्यार, ए मायटी हट, अजान, जलेबी, मालिक आणि रहम सारख्या चित्रपटांत काम केलेय. छोट्या पडद्यावरही तो लोकप्रीय आहे. टीव्ही शो अगर पासून धूप किनारे, तानसेन, मसूरी, निजात, हम तुम, डॅडी, तन्हा आणि बेकसूर यासारख्या टीव्ही शोमध्ये साजिदने काम केलेय.