Join us

​एका चित्रपटानंतर पडद्यावर पुन्हा कधीच दिसला नाही ‘हा’ अभिनेता! आता करतो हे काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 10:31 AM

बॉलिवूडमध्ये अनेकजण येतात आणि येतात तसेच हरवतात. एका-दुसºया चित्रपटात झळकले आणि नंतर बॉलिवूडमधून पुरते गायब झालेत, असे अनेक कलाकार ...

बॉलिवूडमध्ये अनेकजण येतात आणि येतात तसेच हरवतात. एका-दुसºया चित्रपटात झळकले आणि नंतर बॉलिवूडमधून पुरते गायब झालेत, असे अनेक कलाकार या इंडस्ट्रीत आहेत. पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्याने दुसरा चित्रपट मिळालाच नाही, असे अनेकजण याठिकाणी आहेत. पण यात असेही काही आहेत, ज्यांचा पहिला चित्रपट चालला पण तरीही ते दुस-यांदा पडद्यावर दिसले नाहीत. बॉलिवूडचा एक अभिनेताही असाच. तो केवळ एका चित्रपटात दिसला आणि यानंतर इंडस्ट्रीतून कायमचा बाद झाला. हा अभिनेता कोण तर नकुल कपूर. होय, २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटात नकुल दिसला. त्याच्या सुंदर चेह-याने तरूणींना भुरळही घातली. पण का कोण जाणे, नकुलचा दुसरा चित्रपट आलाचं नाही. आता तर नकुल पूर्णपणे लोकांच्या विस्मृतीत गेलायं. बॉलिवूडवर मनापासून प्रेम करणारे चाहतेही त्याला विसरले आहेत. ‘तुम से अच्छा कौन है’ मधून नकुलने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात आरती छाबरिया आणि किम शर्मा त्याच्यासोबत लीड रोलमध्ये दिसल्या होत्या. हा चित्रपट फ्लॉप झाला, असे नव्हतेच. खरे तर बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने उल्लेखनीय यश मिळवले होते. पण असे असूनही या चित्रपटानंतर नकुल पुन्हा पडद्यावर दिसला नाही.  ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटाआधी १९९८ मध्ये ‘हो गई है मोहब्बत तुमसे’ या अल्बमध्ये नकुल झळकला होता. याच अल्बमने नकुलला स्वत:च्या हिमतीवर चित्रपट मिळवून दिला होता.आज नकुल काय करतोय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तो सध्या कॅनडात आहे. येथे तो एक योगा टीचर आहे. कॅनडात तो डिवाईन लाईट नामक योग केंद्र चालवतो. मध्यंतरी नकुलच्या मृत्यूची अफवा पसरली होती. पण नकुलने स्वत: मीडियासमोर येते, आपल्या मृत्यूची बातमी खोटी ठरवली होती.