Join us

सलमान खानला शिक्षा ठोठावताच ‘बागी-२’च्या निर्मात्याने घेतला ‘हा’ निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 10:02 AM

सुपरस्टार सलमान खानच्या शिक्षेमुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला असून, त्याने लवकरात लवकर तुरुंगाबाहेर यावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. ...

सुपरस्टार सलमान खानच्या शिक्षेमुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला असून, त्याने लवकरात लवकर तुरुंगाबाहेर यावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. सलमानचे इंडस्ट्रीत अनेकांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामध्ये ‘बागी-२’चे निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या नावाचाही समावेश आहे. आपला मित्र तुरुंगात गेल्याने साजिद दु:खी झाले असून, त्यांनी ‘बागी-२’ची यशस्वी पार्टी रद्द केली आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी-२’ने बॉक्स आॅफिसवर झटपट कमाई करताना शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. अजूनही हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. परंतु सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झाल्याने त्यांनी पार्टी रद्द केली आहे. तसेच ते जोधपूरलाही रवाना झाले आहेत. साजिद नाडियाडवाला यांनी सलमानसोबत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. अखेरीस या जोडीने २०१४ मध्ये आलेल्या ‘किक’ची निर्मिती केली होती. काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, साजिद लवकरच ‘किक-२’ची घोषणा करणार आहेत. दरम्यान, सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. १९९८ मधील या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल समोर आला आहे. सध्या सलमान जोधपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सलमानसोबत त्याचे सहकलाकार सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांचीही नावे या प्रकरणात होती. परंतु न्यायालयाने सलमानला सोडून इतर सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सुरूज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे प्रकरण घडले होते.