Join us  

अंबानींच्या कार्यक्रमादरम्यान ऑरीच्या वडापावमध्ये आढळला केस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:52 AM

अंबानींच्या कार्यक्रमात ऑरीला एका वडापावमध्ये केस आढळला.

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह (Anant Ambani Radhika Merchant Wedding) सोहळा १२ जुलै रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा चालू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरं प्री-वेडिंग सेलिब्रेशन इटलीमध्ये एका क्रूझवर झालं होतं. यासाठी अनेक सेलेब्रेटी या सेलिब्रेशन सोहळ्यात सामील झाले होते. यासाठी ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीसुद्धा इटलीत पोहचला होता. 

ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीनं अंबानींच्या कार्यक्रमातील विविध व्लॉग्स आपल्या युट्यूबवर शेअर केले. यातच आता ऑरीचा पोर्तोफिनोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायर होतोय. ज्यामध्ये ऑरीने तेथील विविध फूड स्टॉल्स दाखवले. या व्हिडीओमध्ये अंबानी कुटुंबीयांनी आपल्या पाहुण्यांसाठी विविध प्रकारच्या पदार्थांची व्यवस्था केली केल्याचं दिसलं. 

ईटलीतील व्लॉगमध्ये ऑरी हा एका स्टॉलवरून दुसऱ्या स्टॉलवर जाताना आणि वेगवेगळे पदार्थ चाखताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसतं की ऑरी आणि त्याची मैत्रिण तान्या श्रॉफ हे एका स्टॉलवर थांबतात आणि 'पोर्तोफिनोमधील सर्वोत्कृष्ट वडापाव' असं म्हणत वडापावचा आनंद घेतात. पण, यातच तान्याला केस दिसतो. त्या केसावर ऑरी झूम करतो आणि दुसरा वडापाव मागवतो. यावर तानिया म्हणते, 'मला अजून एक घास खायचा होता. पण त्यात केस आहे'. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

ऑरीबद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूडमधील जवळपास सर्वच पार्टींमध्ये ऑरीची उपस्थिती असतेच. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर जवळपास या सर्वच अभिनेत्रींसोबत त्याची खास मैत्री आहे. शिवाय हटके फोन केस, त्याची अतरंगी ड्रेस , महागड्या वस्तू यामुळे ऑरी नेहमीच चर्चेत येतो. हॉलिवूड स्टार कायली जेनरसोबत व्हायरल झालेल्या फोटोनंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. आता त्याने रिहानासोबतच्या फोटोंनी सगळीकडे हवा केली आहे. आता अंबानाची या लग्नसोहळ्यातही ऑरीची चर्चा आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडइटलीमुकेश अंबानीअनंत अंबानी