साऊथ इंडिस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा आज (9 ऑगस्ट) वाढदिवस. 2003 मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या हिंदी मालिकेतून बालकलाकार म्हणून हंसिकाने तिच्या करिअरची सुरूवात केली.
9 ऑगस्ट 1991 रोजी बिझनेसम प्रदीप मोटवानी यांच्या घरी जन्मलेली हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातही हंसिका बालकलाकार म्हणून दिसली.
2007 साली हंसिका हिमेश लीड अॅक्ट्रेस म्हणून रेशमियासोबत ‘आपका सुरूर’ या चित्रपटात झळकली. पण तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला होता. याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती आणि तिने स्वत:पेक्षा 18 वर्षे मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला होता. याशिवाय चित्रपटात हंसिका वयापेक्षा बरीच मोठी दिसत होती. यानंतर लवकरच मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचीही चर्चा रंगली होती. अर्थात हंसिका किंवा तिच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता.
2015 मध्ये हंसिका एका मोठ्या वादात अडकली होती. तिचा एक बाथरूम एमएमएस लीक झाला होता. यावरून मोठे वादळ उठले होते. असे व्हिडीओ लीक होणे हे बलात्कारापेक्षाही वाईट असते, असे हंसिका यावर म्हणाली होती. पण हंसिका या वादाला धैर्याने सामोरी गेली.
हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात हंसिकाची मूर्ती आहे.