Join us

लग्नाच्या एका महिन्यानंतर हंसिका मोटवानीने चाहत्यांना दिली सरप्राईज, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 6:49 PM

लग्नाच्या एका महिन्यानंतर आता हंसिका तिच्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देणार आहे, ज्याची माहिती तिने व्हिडिओद्वारे आहे.

Hansika Motwani New Show On OTT: साऊथची ब्युटी हंसिका मोटवानी (Hansika Motwani ) लग्नबंधनात अडकली. 4 डिसेंबरला हंसिकाने तिचा बॉयफ्रेन्ड सोहेल कथुरियासोबत (Sohael Kathuriya) लग्नगाठ बांधली. जयपूरच्या मुंडोता फोर्टमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाची साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळीकडे चर्चा झाली. सध्या अभिनेत्री तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करतेय. लग्नाच्या एका महिन्यानंतर आता हंसिका तिच्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देणार आहे, ज्याची माहिती तिने व्हिडिओद्वारे आहे.

हंसिका मोटवानीच्या लग्नावर बनवणार शोअभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या आगामी शो 'हंसिका लव्ह शादी ड्रामा' ची घोषणा केली आहे. या शोमध्ये हंसिका मोटवानीचे खऱ्या आयुष्यातील लग्न दाखवण्यात येणार आहे. या शोमध्ये लग्नाच्या सगळ्यात विधी दाखवण्यात येणार आहेत. हा शो एक आउट-अँड-आउट रिअॅलिटी शो असेल, जो डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल.

हंसिका मोटवानीने या व्हिडीओमध्ये शोबद्दल सांगताना सांगितले. 'हाय, मी हंसिका मोटवानी आहे आणि नुकतेच माझ्या आयुष्यात खूप खास घडले, माझे लग्न झाले. माझं संपूर्ण लग्न  फक्त डिस्ने+हॉटस्टारवर पाहता येईल. लव्ह शादी ड्रामा असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये लग्नाच्या विधींसोबतच वेडिंग प्लानर्सपासून वेडिंग आउटफिट डिझायनर्सपर्यंत सर्व काही दाखवण्यात येणार आहे.

हंसिका मोटवानीच्या लग्नाचे सर्व फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, परंतु आता चाहत्यांना अभिनेत्रीचं  संपूर्ण लग्न पाहण्याची संधी मिळणार आहे, ज्याबद्दल ते खूप उत्सुक आहेत. हंसिकाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :हंसिका मोटवानीसेलिब्रिटीTollywood