बी-टाऊनचे पॉवरफुल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची झाली आहे. राहा हिच्या वाढदिवसाचे खास आयोजन हे करण्यात आले. फक्त जवळचे लोक या पार्टीला उपस्थित राहिले. आलिया भट्टने मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर राहाचे काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय तिनं मुलीसाठी एक प्रेमळ नोट लिहिली. तिने म्हटलं, 'आमचा आनंद, आमचा जीवन.. आमचा आयुष्यातला प्रकाश! तु माझ्या गर्भात होतीस आणि तुझ्यासाठी आम्ही हे गाणे वाजवत होते, ही गोष्ट अगदी कालचीच वाटते. तु आमच्या आयुष्यात आलीस आणि सर्वंच छान झालं. केकच्या गोड तुकड्यासारखी आहेस. हॅपी बर्थडे बेबी टायगर.. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे'.
आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहा केकसोबत खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत आलिया, रणबीर आणि राहाचा हात दिसतोय आणि त्यांच्या हातात फुल दिसत आहे. या फोटोवर काही क्षणातच चाहत्यांनी लाईक्सचा वर्षांव केलाय. तिच्या या पोस्टवर रिद्धिमा कपूर आणि इतर सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
रणबीर- आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच रणबीर ‘अॅनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तर आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. शिवाय, आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.