बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाह आज आपला 36वा बर्थ डे सेलिब्रेट करते आहे. डेजीने सलमान खानच्या जय हो सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. जय हो' सिनेमातून डेजीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात ती सलमानच्या अपोझिट दिसली होती. वास्तविक डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'जय हो' सिनेमानंतर.
कोरियोग्राफरपासून अभिनेत्रीपर्यंतचा प्रवासडेजी अभिनेत्री बनण्याअगोदर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती. एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे डेजीकडे लक्ष गेले. पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. पुढे डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले. या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती. याचदरम्यान तिला २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एका मुलाखती दरम्यान डेजीने म्हणाली, ''मी सलमानसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. अनेक वेळा मला काही सल्ला लागला तर मी सलमानला फोन करते. अशी एकही गोष्ट नाही जी मी सलमानपासून लपवली आहे.'' डेजीला सिनेमाच्या सेटवर उशीरा पोहोचणे अजिबात आवडतं नाही, ती नेहमी आपल्या वेळेत सेटवर हजर असते.