दीपिका पादुकोण आजघडीला बॉलिवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज दीपिकाचा वाढदिवस. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... तेव्हा पाहा तर
दीपिका पादुकोण हिचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव प्रकाश पादुकोण असून ते एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत.
वडिलांकडे पाहून तिने लहानपणीच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. काही काळानंतर ती राष्ट्रीय खेळाडू बनली. पण अभिनेत्री बनायचे हे तिचे पक्के ठरले होते.
पुढे सर्व काही सोडून तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. २००४ पासून तिने पूर्णवेळ मॉडेलिंगला वाहून घेतले. २००५ मध्ये दीपिकाने पहिल्यांदा लॅक्मे फॅशन वीकच्या रनवेवर वॉक केला.
२००६ स्विम सूट कॅलेंडरसारख्या प्रसिद्ध प्रिंट कँपेनमध्ये तिने पोझ दिल्यानंतर ती ख-या अर्थाने नावारूपास आली. त्याच वर्षी तिला मॉडेल आॅफ द इयरचा पुरस्कार मिळाला.
२००६ मध्ये तिने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटापासून कारकीदीर्ला प्रारंभ केला. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी २१ व्या वर्षी आपल्या आत्यासमवेत मुंबईला आली.
दीपिकाला पहिला ब्रेक दिला तो हिमेश रेशमियाने. हिमेशच्या नाम है तेरा या अल्बममध्ये दीपिकाला संधी मिळाली आणि तिने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर तिला हिंदी चित्रपटाचे प्रस्ताव येऊ लागले.
एक दिवस फराह खानने हिमेश रेशमियाचा व्हिडिओ अल्बम पाहिला तेव्हा तिची नजर दीपिकावर पडली आणि तिने तिला आपला पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’मध्ये सुपरस्टार शाहरुख खानबरोबर कामाची आॅफर दिली.
दीपिका सध्या भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री समजली जाते. ‘ट्रिपल एक्स रिटर्न आॅफ जँडर केज’ या चित्रपटाव्दारे तिने हॉलीवूडमध्येही पदार्पण केले.