Join us

Happy Birthday Gauri Khan: शाहरुख खानच्या 'या' सवयीला कंटाळून गौरी खान करणार होती ब्रेकअप

By गीतांजली | Published: October 08, 2020 11:15 AM

दिल्लीत राहणाऱ्या गौरीचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला होता.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी आणि फॅशन दिवा गौरी खानचा आज वाढदिवस आहे. गौरी आज आपला 50वा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. दिल्लीत राहणाऱ्या गौरीचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला होता.  गौरी आणि शाहरुखची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्हस्टोरी पैकी एक आहे. शाहरुख खान गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता म्हणून तिने ब्रेकअप करण्याचा विचार केला होता. 

अनुपमा चोपडा यांच्या 'किंग ऑफ बॉलिवूडः शाहरुख खान और सिडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा.' या पुस्तकात त्यांनी गौरी खान आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला होता. या पुस्तकात अनुपमा यांनी लिहिले आहे, शाहरुख गौरीला घेऊन पझेसिव्ह होता, म्हणून गौरीने त्याला सोडून जाण्याच्या विचारात होती. त्यानंतर गौरीचा राग मावळला. शाहरुखने गौरीच्या कुटुंबाला लग्नासाठी तयार केले होते. यासर्व गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात आहे. 

गौरी १४ वर्षांची आणि शाहरूख १९ वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मग गौरी हीच जणू शाहरूखचा ध्यास बनली. त्याने गौरीसमोर स्वत:चे प्रेम व्यक्त केले. सुरुवातीला गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचे खरे प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकली नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी. 25 ऑक्टोबर 1991 मध्ये अतिशय कमी लोकांच्या उपस्थित लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला गौरीच्या घरातून विरोध होता. पण कालांतराने हा विरोध मावळला. 

टॅग्स :गौरी खानशाहरुख खान