सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात करणारा हिमेश रेशमिया आज आपला ५० वाढदिवस साजरा करतो आहे. 23 जुलै 1973 रोजी महुवा येथे जन्मलेल्या हिमेशने बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांना संगीत दिलं आहे.‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’ अशी सुपरहिट गाणी हिमेश रेशमियाची प्रचंड गाजली होती. आजही हिमेशच्या गाण्यांची जादू कमी झालेली नाही. हिमेश त्याच्या कामापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
हिमेश रेशमिया विवाहित असूनही सोनियाच्या प्रेमात पडला होता. सोनिया हिमेशची पहिली पत्नी कोमलची खूप चांगली मैत्रीण होती, असे म्हटले जाते. अनेकवेळा सोनिया हिमेश आणि कोमलच्या घरी जायची. हिमेश आणि सोनियांची पहिली भेटही कोमलनेच लावली होती. असे म्हटले जाते की हिमेश आणि सोनियाने 2006 सालीच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, ज्याची कल्पना ही त्याची पहिली पत्नी कोमलला नव्हती.
सोनियाच्या प्रेमात हिमेश इतका वेडा झाला होता की, त्याने कोमलसोबतचं 22 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017 मध्ये हिमेशने कोमलला घटस्फोट दिला. दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव स्वयं आहे. हिमेशची सोनिया कपूरशी जवळीक वाढल्याने कोमल आणि हिमेशचे नाते नाजूक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
कित्येक वर्ष हिमेश सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. त्यानंतर दोघांनी २०१८मध्ये लग्न केलं. सोनिया कपूरही टीव्ही अभिनेत्री असून तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. सोनियाने आतापर्यंत ‘कभी कभी’, ‘कुसुम’, ‘कभी हां, कभी ना’, ‘परिवार’ आणि ‘कैसा ये प्यार है’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फरेब’, ‘ऑफिसर’, ‘सत्ता’ या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.