Join us

John Abraham's Birthday : देशभक्तीपर चित्रपटांनी मिळाली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:45 PM

जॉन अब्राहमने गतकाळात ‘मद्रास कॅफे’ आणि ‘फोर्स’ सारख्या चित्रपटात सैनिक आणि पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून जॉन सातत्याने देशभक्तीपर चित्रपट देत असून या चित्रपटांद्वारे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...

-रवींद्र मोरेआज जॉन अब्राहम आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. जॉन सिने इंडस्ट्रीतला असा कलाकार आहे ज्याच्या कामाने सातत्याने बदल बघावयास मिळाला आहे. २००३ मध्ये जॉनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तेव्हा कुणालाच वाटत नव्हते की, हा चॉकलेटी हिरो पुढे चालून देशभक्तीपर चित्रपट करेल. जॉनने गतकाळात ‘मद्रास कॅफे’ आणि ‘फोर्स’ सारख्या चित्रपटात सैनिक आणि पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून जॉन सातत्याने देशभक्तीपर चित्रपट देत असून या चित्रपटांद्वारे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...* परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण

जॉनने २०१८ मध्ये ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ द्वारा भारतीय इतिहासातील गौरवान्वित क्षण पडद्यावर दाखविला आहे. १९९८ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता परमाणु शक्ती मिळविली होती. या चित्रपटात जॉनने एक आयएएसची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात जॉनला जाते. कारण त्याने या चित्रपटात अभिनयाबरोबरच निर्मितीदेखील केली होती.* सत्यमेव जयते

'शूटआउट एट वडाला' नंतर दुसऱ्यांदा जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात एकत्र दिसले होते. २०१८ मध्ये आलेल्या या चित्रपटात जॉनने एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली होती जो समाजाचे शत्रू बनलेल्या एक-एक पोलीसाला संपवतो. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भागदेखील रिलीज होणार आहे.* रोमियो अकबर वाल्टर

यंदाच रिलीज झालेल्या या चित्रपटात जॉन अब्राहमने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. देशसेवेसाठी आपल्या जीवाची परवाही करत नाही आणि पाकिस्तानात जाऊन भारताच्या विरोधात बनत असलेल्या एक-एक योजनेला नाकाम करतो. या चित्रपटात जॉनचे विविध रुप बघावयास मिळाले आहेत.* बाटला हाउस

हा चित्रपटही यंदाच रिलीज झाला आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट आपल्या विषयाच्या कारणाने खूपच चर्चेत होता. या चित्रपट दक्षिण दिल्लीच्या बाटला हाऊस परिसरात झालेल्या एन्काउंटरवर आधारित आहे. चित्रपटात एन्काउंटरच्या अवतीभोवती फिरणाऱ्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सोबतच हे देखील दाखविण्यात आले आहे की, राजकारण आणि मीडियाच्या दबावाने संपूर्ण घटनाक्रमावर कसा परिणाम होतो. या चित्रपटात जॉनने एसीपी संजय कुमारची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :बॉलिवूडजॉन अब्राहमबाटला हाऊससत्यमेव जयते चित्रपट