Join us

Happy Birthday Kajol : ४० दिवसांच्या हनीमूननंतर थकला होता अजय, काजोलने केला होता 'हा' मजेदार खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 10:36 AM

काजोलने 'बेखुदी' सिनेमा साईन केला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि पती अजय देवगनच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

आपल्या अदांसाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस. ती आता ४६ वर्षांची झाली. ५ ऑगस्ट १९७४ ला जन्मलेल्या काजोलने 'बेखुदी' सिनेमा साईन केला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि पती अजय देवगनच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

काजोल-अजयची लव स्टोरी

साधारणपणे कोणत्याही प्रेमसंबंधात मुलगा मुलीला प्रपोज करतो. पण इथे उलट होतं. काजोलने अजयला प्रपोज केलं होतं. अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती 'हलचल' सिनेमाच्या सेटवर. पहिल्या भेटीत काजोलला वाटलं होतं की अजय फार घमंडी आहे. पण नंतर तिचा भ्रम दूर झाला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. असे म्हणतात की, काजोल तिच्या बॉयफ्रेन्डबाबतचे सल्ले अजयकडून घेत होती. दोघे चांगले मित्र होते. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनाही समजले नाही. दोघांना बस सोबत रहायचं होतं.

काजोलच्या घरातून अजयला विरोध

नेहा धुपियाचा रेडिओ शो #NoFilterNeha मध्ये काजोलने सांगितले होते की, 'कुणाचीही इच्छा नव्हती की मी अजयसोबत लग्न करावं. माझ्या परिवारातील लोक फार कन्फ्यूज होते. जेव्हा मी वडिलांना सांगितले की, मला  अजयससोबत लग्न करायचंय. तर ते माझ्याशी एक आठवडा बोलले नव्हते. माझ्या परिवारातील लोकांना वाटत होतं की, लग्नासाठी माझं वय लहान आहे. पण मी माझ्या विचारावर अडून राहिले'.

हनीमूनला अजयने केले होते बहाणे

काजोलने तिच्या हनीमूनबाबतही काही किस्से शेअर केले होते. तिने सांगितले होते की, मी अजयसोबत बेट लावली होती की, आपण २ महिन्यांसाठी हनीमूनवर जाऊ. ऑस्ट्रेलिया लास वेगास आणि इतरही काही ठिकाणी फिरल्यावर आम्ही ४० दिवसांनी ग्रीसला पोहोचलो. अजय फार थकलेला होता. काजोल म्हणाली की, एका सकाळी अजय झोपेतून उठून बोलला की, त्याला ताप आहे आणि जोरात डोकंही दुखतंय. मी म्हणाले, तुम्हाला औषध देते. पण अजय पुन्हा पुन्हा हेच सांगत होता माझी तब्येत चांगली नाही. अजय म्हणाला की, 'घरी चल'. अशात आम्ही हनीमून मधेच सोडून मुंबईला परत आलो.

हे पण वाचा :

काजोलमुळे झाले होते अजय-करिश्माचे ब्रेकअप ! फोनवर दोघांचा आवाज ऐकला आणि...

‘साहो’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजीत रेड्डी अडकला रेशीमगाठीत, लग्नाचे Inside फोटो आले समोर

टॅग्स :काजोलबॉलिवूडसेलिब्रिटी