Join us

Happy Birthday Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील या रहस्याचा आजही झाला नाहीये उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:20 PM

आज या घटनेला अनेक वर्षं झाले असले तरी या गोष्टीचा अद्याप उलगडा झालेला नाही.

ठळक मुद्देलता मंगेशकर यांना मारण्याचा काही वर्षांपूर्वी प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याचा त्यांनीच खुलासा केला होता.

गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा आज म्हणजचे 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना मारण्याचा काही वर्षांपूर्वी प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याचा त्यांनीच खुलासा केला होता. प्रसिद्ध कवियत्री आणि हिंदी साहित्यकार पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ही घटना 1962 मधील आहे. त्यावेळी लता मंगेशकर या प्रचंड प्रसिद्धीझोतात होत्या. त्यांनी आपल्यासोबत काम करावे अशी प्रत्येक संगीतकाराची इच्छा होती. लता या केवळ त्यावेळी 33 वर्षांच्या होत्या. त्या एकेदिवशी झोपेतून उठल्या तर त्यांच्या पोटात प्रचंड दुखू लागले आणि त्यांना खूप साऱ्या उलट्या देखील होत होत्या. त्यांना जागेवरून हलता देखील येत नव्हते. त्यांची ही अवस्था पाहून घरातील सगळीच मंडळी प्रचंड घाबरली होती आणि त्यामुळे त्यांच्या घरातल्यांनी लगेचच डॉक्टरांना बोलावले. तीन दिवस तरी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

लता मंगेशकर यांना जेवणातून स्लो पॉयझन देण्यात आले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यामुळे त्या प्रचंड अशक्त झाल्या होत्या. त्या जवळजवळ तीन महिने तरी अंथरूणाला खिळून होत्या. त्यांना त्या दरम्यान केवळ थंड सूप पिण्याची परवानगी होती. ही घटना झाल्यानंतर लता मंगेशकर यांच्या घरातील जेवण बनवणारे सगळे आचारी पळून गेले होते. हे आचारी पूर्वी बॉलिवूडमधील काही मंडळींकडे देखील काम करत होते.  

या घटनेनंतर लता मंगेशकर यांच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी स्वीकारली. आज या घटनेला अनेक वर्षं झाले असले तरी लता मंगेशकर यांना जेवणातून कोणी विष देण्याचा प्रयत्न केला होता याचा अद्याप उलगडा झालेला नाही. 

टॅग्स :लता मंगेशकर