Happy Birthday rajinikanth : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:52 AM
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याचा आज (१२ डिसेंबर)वाढदिवस. साऊथमध्ये देवासारखा पुजल्या जाणा-या रजनीकांतने अनेक संघर्षाअंती हे यश मिळवले. रजनीकांत ९ ...
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याचा आज (१२ डिसेंबर)वाढदिवस. साऊथमध्ये देवासारखा पुजल्या जाणा-या रजनीकांतने अनेक संघर्षाअंती हे यश मिळवले. रजनीकांत ९ वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरवले. यानंतर पोट भरण्यासाठी रजनीने अनेक लहान-मोठे कामे केलीत. अगदी ओझीही त्याने उचललीत. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत बस कंडक्टर होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण अशाही काही गोष्टी आहेत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील. अशाच काही गोष्टींविषयी जाणून घेऊ यात... रजनीकांतची सर्वात पहिली भूमिका केवळ १५ मिनिटांची होती. होय,‘Apoorva Raagangal’’ हा रजनीचा पहिला चित्रपट. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या सिनेमात रजनीकांतला केवळ १५ मिनिटांची भूमिका मिळाली होती. त्याच्याकडे प्रेक्षकांचे साधे लक्षही गेले नव्हते. पुढे हेच बालचंदर रजनीकांत यांचे गुरु बनले. शाळेपासूनच रजनीकांतला अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. रावणाची भूमिका करायला त्याला फार आवडायचे. पुढे चित्रपटसृष्टीत आल्यावर एस. पी. मुथुरामन यांनी रजनीकांतला खलनायकाचे नायक बनवले. मुथुरामन यांच्या ‘Bhuvana Oru Kelvikkuri ’ या चित्रपटातील पहिल्या हाफमध्ये रजनी खलनायक म्हणून दिसला आणि नंतरच्या हाफमध्ये नायक म्हणून. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि सोबतच रजनीही हिट झाला. मुथुरामन यांच्याच ‘Aarilirunthu Arubathu Varai’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये रजनीकांतला वृद्धावस्थेत दाखवण्यात आले. हा सिनेमाही तुफान गाजला. रजनीकांत याने तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. या चित्रपटांनी त्याला ग्लॅमर, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळे काही मिळवून दिले. पण एक क्षण असाही आला, जेव्हा हे सगळे सोडून निघून जावे, असे रजनीला वाटले. त्याने अभिनय सोडण्याचा निर्णयही घेतला. पण के. बालचंदर, कमल हासनसारख्या जवळच्या मित्रांनी त्याला या निर्णयापासून परावृत्त केले. यानंतर प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातो.त्याच्या प्रत्येक हिमालय भेटीत हृषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्याला दिली जाते. रजनीकांत आज खूप मोठा स्टार आहे. पण या स्टारचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. रजनीकांतच्या घरात एक विशेष गेस्टरूम आहे. हे गेस्टरूम त्याचा लहानपणीचा मित्र राज बहाद्दूर यांच्यासाठी बनवले आहे. रजनीकांत बंगळुरूमध्ये बस कंडक्टर होता, तेव्हापासून राज बहाद्दूर आणि त्याची मैत्री आहे. रजनीकांत अजूनही कधी-कधी लपून बंगळूरूला जातो आणि त्याच्या या मित्राच्या घरी खुप दिवस राहतो. ALSO READ : ‘हॉलिवूड’ने केली रजनीकांत यांची फसवणूक ! निर्माते करणार कायदेशीर कारवाई!!सन २००७ मध्ये आलेला ‘शिवाजी: द बॉस’ या चित्रपटासाठी रजनीला २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, रजनीकांत त्याच्या चित्रपटाच्या मानधनातील अर्धा भाग दान करतो.