Join us

Happy Birthday Raveena Tandon! पाहा,‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनच्या काही अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:33 AM

 रवीना टंडन हिचा आज (26 आॅक्टोबर) वाढदिवस. रवीना आज ४३ वर्षांची झाली़ पण रवीनाला पाहिल्यावर तिने चाळीशी ओलांडलीयं, यावर विश्वास बसत नाही. आजही रवीना तितकीच तरूण दिसते.

 रवीना टंडन हिचा आज (26 आॅक्टोबर) वाढदिवस. रवीना आज ४३ वर्षांची झाली़ पण रवीनाला पाहिल्यावर तिने चाळीशी ओलांडलीयं, यावर विश्वास बसत नाही. आजही रवीना तितकीच तरूण दिसते.रवीना ही बॉलिवूडच्या बेधडक अभिनेत्रींपैकी एक आहे. मुद्दा कुठलाही असो, आपले बेधडक मत मांडायला ती घाबरत नाही.

 १९९५ मध्ये रवीनाने पूजा आणि छाया अशा दोन मुलींना दत्तक घेतले होते. तेव्हा रवीना केवळ २१ वर्षांची होती. आज पूजा आणि छाया दोघींचीही लग्नं झाली आहेत आणि त्या आपल्या संसारात आनंदी आहेत.

- १९९४ हे वर्ष रवीनाच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण वर्ष सिद्ध झाले. यावर्षात आलेले मोहरा, लाडला, दिलवाले,अंदाज अपना अपना हे तिचे सिनेमे सुपरहिट ठरले. मोहरा हा तर सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...; हे गाणे अपार लोकप्रीय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. याच ‘मस्त मस्त गर्ल’चे काही ताजे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्ही पुन्हा एकदा रवीनाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. रवीनाच्या वडिलांचे नाव रवि टंडन तर आईचे नाव वीणा टंडन होते. याच दोघांची नावे मिळून रवीनाचे नाव रवीना असे ठेवण्यात आले. रवीनाचे वडील एक नामवंत चित्रपट निर्माते होते.

- रवीना कॉलेजमध्ये असताना एकेदिवशी तिची ओळख दिग्दर्शक शांतनु शोरी यांच्याशी झाली. शांतनु यांनी रवीनाला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला आणि याचमुळे कॉलेज सोडून रवीनाने बॉलिवूडची वाट धरली.

सन १९९१ मध्ये प्रदर्शित ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात सलमान खान तिचा हिरो होता. हा चित्रपट दणकून आपटला. पण यातील रवीनाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. -२००३ मध्ये रवीना निर्मिती क्षेत्रात उतरली. ‘स्टंप्ड’ या चित्रपटाची निर्मिती तिने केली. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश आले नाही. पण एका गोष्टीत मात्र तिला यश आले. ते म्हणजे, वितरक अनिल थडानीचे प्रेम तिला मिळाले.

२००४ मध्ये रवीना अनिलसोबत लग्नबंधनात अडकली. यानंतर रवीनाने पुन्हा ‘पहचान’ चित्रपटाची निर्मिती केली. पण हा चित्रपटही अपयशी ठरला.

 

टॅग्स :रवीना टंडन