बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याचा आज वाढदिवस. आज सलमान 54 वा वाढदिवस साजरा करतोय. पन्नाशी कधीच ओलांडलेल्या सलमानने अनेक हाय-प्रोफाईल अभिनेत्री व मॉडेलला डेट केलेय. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ ते युलिया वंतूर अशा अनेकींना सलमानने डेट केले. पण सलमानची सर्वात पहिली गर्लफ्रेन्ड कोण होती, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय, बॉलिवूडमध्ये ‘कबीर सिंग’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणा-या कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या मावशीसोबत सलमानचे अफेअर होते. तिचे नाव काय तर शाहीन जाफरी.
होय, पेशाने मॉडेल असलेली शाहीन जाफरी सलमानचे पहिले प्रेम होते. त्यावेळी सलमान केवळ 19 वर्षांचा होता.या शाहिनची आणखी दुसरी ओळख द्यायची झाल्यास सुपरस्टार अशोक कुमारची ती नात. आता कियारासोबत शाहिनचे कनेक्शन सांगायचे झाल्यास, अशोक कुमार यांची मुलगी भारतीने अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हामिद जाफरीसोबत दुसरे लग्न केले होते. हामिद-भारती यांना जेनिव (आडवाणी) आणि शाहीन जाफरी या दोन मुली आहेत. जेनिव ही कियाराची आई आणि शाहीन ही कियाराची मावशी.
कियाराच्या याच मावशीवर सलमान एकेकाळी फिदा होता. खुद्द कियाराने एका मुलाखतीत हे सांगितले होते. शिवाय सलमानच्या बायोग्राफीतही याचा उल्लेख आहे. कियाराने सांगितले होते की, ‘माझी आई जेनिव ही सलमानला ओळखायची. कारण दोघेही वांद्रयात लहानाचे मोठे झाले आहेत. माझ्या आईची व सलमानची चांगली मैत्री होती. माझ्या आईनेच शाहीन मावशी व सलमानची भेट घालून दिली होती. यानंतर शाहीन मावशी व सलमान एकमेकांना डेट करू लागले होते. कदाचित दोघांचेही हे पहिले प्रेम होते.’
कॉलेजबाहेर तासन् तास उभा राहत होता सलमानत्याकाळी लाल रंगाची स्पोर्ट कार नेहमी सेंट झेव्हिअर कॉलेज बाहेर उभी असायची कारण तिथे शाहीन शिकत होती.
...अन् झाले ब्रेकअप
विश्वदीप घोष यांनी सलमानची बायोग्राफी लिहिली आहे. त्यात त्यांनी शाहीन व सलमानच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की,‘सलमानने शाहीनला गर्लफ्रेन्ड म्हणून कुटुंबीयांना भेटवले होते. दोघांच्या घरच्यांनी त्यांना परवानगी दिली होती. या नात्याचे रुपांतर लवकरच लग्नात होईल, असेच सगळ्यांना वाटले होते. परंतु प्रसिध्द मॉडेल आणि 1980मध्ये मिस इंडिया राहिलेली संगीता बिजलानी या नात्याच्या आड आली. त्या दिवसांत संगीता बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर एकटी पडली होती. ती नेहमी ‘सी रॉक’ हॉटेलच्या हेल्थ क्लबमध्ये दिसत होती. सलमान शाहीनसोबत तिथे जात होता. सलमान हळूहळू शाहीनला सोडून संगीतामध्ये रमला आणि शाहीन त्याच्यापासून दूर होत केली. वयाने मोठी असलेल्या संगीताच्या मॅच्युरिटीमुळे सलमान तिच्याकडे आकर्षित झाला होता.सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्यानंतर शाहीन जाफरीने कॅथ पॅसिफीक एअरलाइन्समध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली आणि सलमानपासून दूर झाली.