ईद असो वा किंग खानचा वाढदिवस (Happy Birthday Shah Rukh Khan) किंवा दिवळी 'मन्नत' बाहेर त्याच्या फॅन्सची गर्दी नेहमीच राहते. शाहरूख खान (Shah Rukh Khan) चा बंगला मन्नत (Mannat) मुंबईमध्ये एक लॅंडमार्क आहे. मुंबईत फिरायला येणारे लोक शाहरूख खानच्या मन्नतला नक्कीच भेट देतात. लोकांना बघायचं असतं की, बॉलिवूड सुपरस्टार कुठे राहतो.
काय आहे 'मन्नत'ची कहाणी?
तुम्हाला माहीत आहे का की, शाहरख खान (Shah Rukh Khan) ने हे घर कशाप्रकारे विकत घेतलं होतं? तुम्हाला या घराची पूर्ण कहाणी माहीत आहे का? शाहरूख खानच्या बर्थडे निमित्ताने या घराचा किस्सा सांगतो. १९९७ मध्ये 'यस बॉस' सिनेमाच्या शूटींगवेळी शाहरूख खानने पहिल्यांदा हा बंगला पाहिला होता. पहिल्या नजरेतच तो या बंगल्याच्या प्रेमात पडला होता.
गुजराती बिझनेसमनने खरेदी केला
शाहरूख खानने हे घर विकत घेण्याचं स्वप्न पाहिलं. त्याने ठरवलं ही एक दिवस तो हा बंगला विकत घेणार. त्यावेळी मन्नतमद्ये गुजराती बिझनेसमन नरीमन दुबास राहत होते. तेव्हा मन्नतचं नाव विला विएना होतं. शाहरूख खानचं हे स्वप्न पूर्ण झालं २००१ मध्ये. तेव्हा त्याने Bai Khorshed Bhanu Sanjana Trust कडून हा बंगला खरेदी केला होता.
आज किती आहे मन्नतची किंमत?
प्रॉपर्टी वेबसाइट हाउसिंग डॉट कॉमनुसार, त्यावेळी शाहरूख खानने या बंगल्यासाठी १३.३२ कोटी रूपये मोजले होते. शाहरूख खानने हे घर खरेदी केल्यावर ४ वर्षापर्यंत विला विएनाच राहिलं. पण नंतर शाहरखने घराचं नाव बदललं. आज २१ वर्षानंतर या घराची किंमत ४०० कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं.