Join us

Happy Birthday Taapsee Pannu: तापसी पन्नू म्हणते, अ‍ॅक्टर नवरा नको रे बाबा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 8:48 AM

तापसी पन्नूचा आज (१ आॅगस्ट) ३१ वा वाढदिवस़ १ आॅगस्ट १९८७ रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. आज तापसी बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाते. 

तापसी पन्नूचा आज (१ आॅगस्ट) ३१ वा वाढदिवस़ १ आॅगस्ट १९८७ रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. आज तापसी बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाते. आजचा वाढदिवस तापसी आपल्या कुटुंबासोबत साजरा करतेय. तिचा हा वाढदिवस आणखी यादगार बनवण्यासाठी आम्ही तापसीचे काही बालपणीचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आजघडीला तापसी ही अत्यंत स्वच्छंदी आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शालेय जीवनातही तापसी अशीच बिनधास्त होती. टॉमबॉय म्हणून तिला ओखळले जायचे. शाळेत शिकत असताना तापसी ही उत्साहाने प्रत्येक खेळात सहभागी व्हायची. बालपणी ती इतकी क्यूट दिसायची की, सर्वांना तिचा हेवा वाटायचा. तिचे बालपणीच्या फोटोत हिच्या या स्वभावाची झलक पाहायला मिळते.

दिल्लीतील माता जय कौर पब्लिक स्कूलमध्ये तापसीचे शालेय शिक्षण झाले. तापसी शिक्षणात हुशार होती. तशीच खेळातही. पाचवीनंतर मुली शक्यतो आऊटडोअर स्पोर्ट्समध्ये सहभागी होत नव्हत्या. पण तापसी सर्वच खेळांत सहभागी होत राहिली.

शाळेत असताना सलग तीन वर्ष तिची 100 टक्के हजेरी होती. कांजण्या झालेल्या असतानाही तिला शाळेत जायची इच्छा होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. तापसीला सायकलिंग प्रचंड आवडत होती. तापसी लहानपणापासून फुडी होती. तिला नेहमी काही तरी खायला लागायचे. लंचब्रेकमध्ये कँटिनमध्ये खाण्याबरोबरच ती मित्रांचे डबे आणि मधे मधे इतर काही खात असायची. तिला फोटो काढायला प्रचंड आवडे.

आठ वर्षांची असताना तापसीने नृत्य शिकणे सुरू केले. तुम्हाला माहित नसेल पण तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण अचानक ती मॉडेलिंगकडे वळली़ यानंतर तिला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले. तेलगू चित्रपटसृष्टीतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

कुठल्याच अभिनेत्याला डेट करणार नाही, हे तापसीने फार पूर्वीच जाहीर करून टाकले आहे. मला माझे काम संपवून अशा एखाद्या व्यक्तीकडे जायला आवडेल जो माझ्या कार्यक्षेत्रातील नाही. दिवसभर काम केल्यानंतर मला चित्रपटाशी निगडीत गोष्टी बोलायला आवडणार नाही. बोलायला वेगळा विषय असेल अशा काही गोष्टी मला करायला आवडतील, असे तिचे कायम म्हणत असते.

टॅग्स :तापसी पन्नू