चित्रपटसृष्टीत काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. या कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील.यात KGF सुपरस्टार यशचे (KGF Superstar Yash) नाव घ्यावे लागे.KGF चित्रपटाची कथा आणि कलाकारांच दमदार अभिनय यामुळे रसिकांनी हा सिनेमा उचलून धरला. याच चित्रपटामुळे यश रातोरात सर्वांचा आवडता अभिनेता बनला. आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि आज यशचे फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
दक्षिणेचा सुपरस्टार बनण्यासाठी यशला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या दिवसांत काम करताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला.मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज तो सुपरस्टार बनला असला तरी इथपर्यंत पोहचणं त्याच्यासाठी तितकं सोपं नव्हतं. यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील भुवानाहल्ली या गावात झाला, त्याचे लहानपणीचे नाव नवीन कुमार गौडा आहे. यशचे बालपण म्हैसूरमध्ये गेले जेथे त्याचे शालेय शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले, शिक्षणानंतर लगेचच तो बिनाका नाटक मंडळात सामील झाला.
यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध ढोलकी वादक बी.व्ही.कर्नाथ यांनी तयार केलेल्याबेनका नाटकाच्या गटात सहभागी झाला. त्याने नंदा गोकुला नावाच्या कन्नड टीव्ही मालिकेने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.यश एका मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. यशचे वडील अरुण कुमार जे केएसआरटीसी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये काम करायचे, नंतर त्यांनी बीएमटीसी ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली.आजही यशचे वडील बस चालवतात.सुपरस्टार यश आज कन्नड सिनेसृष्टीतला सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये एक आहे.