happy Holi!! होळीच्या दिवशी नीतू सिंह यांनी शेअर केला हा थ्रोबॅक फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2017 8:12 AM
अभिनेत्री नीतू सिंह कपूरयांनी सोशल मीडियावर रणबीर व रिधिमा यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिधिमा मस्तपैकी स्माईल देतेय. पण क्यूट रणबीर मात्र भलत्याच कामात गुंग आहे. होय, रणबीरचे सगळे लक्ष हातातल्या लाडूवर खिळले आहे.
डिजेवर वाजणारी बॉलिवूडची गाणी, होळीचे रंग आणि धम्माल मस्ती...अशा काहीशा ‘माहौल’मध्ये अभिनेत्री नीतू सिंह कपूर यांनी एक फ्लॅशबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकदा अनेक सण सेलिब्रेट करताना आपण जुन्या आठवणीत रमतो. होळीच्या सेलिब्रेशनमध्ये तर जुन्या आठवणी हमखास आठवतात. नीतू यांच्याबाबतही असेच काही घडले. यंदाची होळी नीतू यांना अगदी मुलगा रणबीर व मुलगी रिधिमा यांच्या बालपणांच्या आठवणीत घेऊन गेली.नीतू यांनी सोशल मीडियावर रणबीर व रिधिमा यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिधिमा मस्तपैकी स्माईल देतेय. पण क्यूट रणबीर मात्र भलत्याच कामात गुंग आहे. होय, रणबीरचे सगळे लक्ष हातातल्या लाडूवर खिळले आहे. यात चिमुकला रणबीर कमालीचा क्यूट दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी नीतू यांनी जिममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या जिम सेशनच्या व्हिडिओमध्ये नीतू सिंह आपल्या ट्रेनरसोबत अतिशय कठीण एक्सरसाईज करताना दिसल्या होत्या. नीतू सिंह या फिटनेसबाबत अतिशय जागृत आहेत. त्यांची स्टाईल बघता, रणबीरच्या हिरोईन्सपेक्षा त्या जराही कमी नाही, हेच दिसते.सध्या रणबीर अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये बिझी आहे. या रणबीर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरसोबत दिया मिर्झा आणि अनुष्का शर्मा दिसणार आहेत. अभिनेत्री मनीषा कोईराला या चित्रपटात संजय दत्तची आई म्हणजेच नर्गिसची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहिर झालेली नाही. पण रणबीर ज्याप्रकारे या चित्रपटासाठी मेहनत घेतोय, ते पाहून आमच्याप्रमाणे तुम्हालाही या चित्रपटाची अधिक काळ प्रतीक्षा करणे जीवावर आले असणार. होय ना?