Join us

बाबो ! सोनम कपूरची बातच न्यारी, Kiss करतानाचा फोटो शेअर करत दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 19:20 IST

सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर 'ब्लाइंड'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखविण्यात येणार आ

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरला तिचा हा खास फोटो. नेहमीच तिच्या ग्लॅमरस  लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. ती अभिनेत्री म्हणजे मस्सकली सोनम कपूर. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने सोनम कपूरनेही एक फोटो शेअर करत तिचा २०२१ या वर्षामध्ये संकल्पाविषयी सांगितले आहे. विषेष म्हणजे तिने चक्क पती आनंद आहुजाला किस करताचा फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोनमने यापूर्वी कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. मात्र किंस करतानाचा फोटो शेअर करत तिने सा-यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर 'ब्लाइंड'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखविण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे दिसणार आहेत.

 

'ब्लाइंड' ही अशा एका महिला पोलिस अधिका-याची कथा आहे, जिचे कार अपघातात दोन्ही डोळे निकामी होतात. त्यानंतर ती स्वत:चा एक वेगळा सेंस विकसित करते आणि पोलिसांना मदत करते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोम मखीजा करत आहेत.

सोनमचा 'सावरियाँ' हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला होता. पण निराश होण्याऐवजी ती खूप मेहनत करत राहिली. यानंतर सोनम 'दिल्ली 6', 'रांझणा', 'भाग मिल्खा भाग', 'प्रेम रतन धन पायो', 'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' आणि 'संजू' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

टॅग्स :सोनम कपूर