Join us

Happy Republic Day 2019 ! देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 6:00 AM

बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत... बॉलिवूडमधील ही देशभक्तीपर गाणी आजही ऐकू तेवढी कमी

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत... जाणून घेऊया कोणती देशभक्तीपर गीते सगळ्यांच्या ओठावर रुळली आहेत.चक दे इंडियाचक दे इंडिया या चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे ऐकताच एक वेगळा प्रकारचा जोश निर्माण होतो.ए मेरे प्यारे वतन काबुलीवाला या चित्रपटात मन्ना डे यांनी गायलेले ए मेरे प्यारे वतन हे गाणे ऐकताना नकळत डोळ्यात पाणी येते. आज या गाण्याला अनेक वर्ष झाली असली तरी आजही हे गाणे तितकेच ताजे वाटते.ए मेरे वतन के लोगो

लता मंगेशकर यांनी युद्धानंतर गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकताना त्या वेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.आय लव्ह माय इंडिया

परदेस या चित्रपटातील कविता कृष्णमूर्तीने गायलेले आय लव्ह इंडिया हे गाणे आणि या गाण्याचे बोल मनाला नक्कीच स्पर्शून जातात.ए वतन तेरे लियेकर्मा या चित्रपटातील ए वतन तेरे लिये हे गाणे आपल्याला नक्कीच देशप्रेमाची आठवण करून देणारे आहे.अब तुम्हारे हवाले वतन साथीयोहकीगत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथीयो हे गाणे देशभक्तीपर गीतांमधील अनेकजणांचे सगळ्यात आवडते गाणे आहे.मेरा रंग दे बसंती चोला

शहीद या चित्रपटाला आज इतके वर्ष झाले असले तरी या चित्रपटातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. रंग दे बसंतीरंग दे बसंती या चित्रपटाची कथा ही आजच्या जमान्यातील असली तरी कथेचा संबंध हा भगत सिंग यांच्या काळाशी लावण्यात आला होता. या चित्रपटातील रंग दे बसंती हे गाणे अफलातून आहे.संदेसे आते हैबॉर्डर चित्रपटातील संदेसे आते हे गाणे बॉर्डर वर असणाऱ्या सैनिकांची अवस्था अगदी योग्य रीतीने मांडते.भारत हम को जान से प्यारा हैरोजा या चित्रपटात ए आर रहमान यांनी गायलेले भारत हम को जान से प्यारा है हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडणारे आहे.

टॅग्स :प्रजासत्ताक दिनबॉलिवूड