अभिनेता राजसिंग अरोराने गिरीश मलिक दिग्दर्शित संजय दत्त आणि नर्गिस फाखरी अभिनीत ‘तोरबाज’ चित्रपटात क्रिकेट कोचची भूमिका केली आहे. पूर्वी असामाजिक घटकांनी लक्ष्य केलेल्या संघटनांचे मुलांचे आयुष्य आत्मघाती हल्ले करणारे कसे बनवते या खेळाचे चित्रण या चित्रपटामध्ये आहे.राज यांनी हरभजनसिंग द्वारा साकारली जाणारी भूमिका केली आहे. यावेळी बोलताना राज म्हणाले की, "चित्रपटात हरभजन सिंग क्रिकेटचे प्रशिक्षक होणार होते आणि मी दुसरी कोणती तरी व्यक्तिरेखा साकारणार होतो.
एके दिवशी प्रोडक्शन टीमला हरभजनच्या टीमने शूटिंगच्या तारखेला फ्री नसल्याची माहिती दिली. परदेशात शूट करणार हे अगोदरच नियोजित होते. संपूर्ण नियोजन पुन्हा बदलणे फारच अवघड होते. त्याबरोबरच नवीन अभिनेत्याचे ऑडिशन म्हणजे व्हिसा आणि इतर औपचारिकतांसाठीही बरेच कागदपत्राचे काम करावे लागणार. प्रॉडक्शन टीममधील कुणीतरी गिरीश सरांना सुचवले की मी मूळतः एक शीख आहे आणि म्हणून ते या पात्रासाठी माझी स्क्रीन टेस्ट करू शकतात असे सांगितले.
मला बोलावण्यात आले आणि त्या पात्राबद्दल सांगितले गेले, उत्तर भारतीय भाषणामध्ये बोलणार्या शीख प्रशिक्षकाचा देखावा तयार करण्यासाठी मला 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. भज्जी पा जी सारखे व्हा असे मला सांगितले गेले, जे मी स्वीकारले. आतून मी खूप खुश होतो आणि टर्बनेटरचा एक मोठा चाहता असल्याने मला खूप आनंद झाला. "
राज पुढे म्हणतो, "दहा दिवसानंतर माझे स्क्रीन साठी निवडण्यात आले आणि प्रशिक्षकाची भूमिका साकारण्यास सांगितले. संपूर्ण टीम ला हरभजन सर एवढे आवडले कि त्यांनी मला त्याच्यासारखे फलंदाजी करण्यास आणि गोलंदाजी करायला शिकायला सांगितले. स्पिन-बॉलिंग बद्दल छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी मला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाकडून शिकवण्यात आल्या.
आम्ही दररोज सुमारे सहा तास सराव करत होतो. आपल्या बालपणात इतर कोणाप्रमाणे मी क्रिकेट खेळलो आहे पण मला माहित नव्हतं की एक दिवस मला पडद्यावर क्रिकेट कोचची भूमिका साकारायला मिळेल. मी एक शीख कुटुंबातील आहे आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण लांब केस (केश) ठेवतो. भूमिकेसाठी मी माझ्या मुळात परत जाण्यात आनंदी होतो. आशा आहे की लोकांना ही फिल्म आवडेल आणि फिल्मद्वारा दिला जाणार संदेश आवडेल."
तेलुगूमधील ‘सहसम’, हिंदीतील ‘डब्ल्यू’ आणि द ग्रेट इंडियन एस्केप यासारख्या चित्रपटाचा राज एक भाग होता, साक्षी तंवर सोबत "करले तू भी मोहब्बत" या वेब्सएरिएस मध्ये राज ने साक्षी च्या लव्ह इंटरेस्ट चा रोल केला आहे त्या रोल साठी अजूनही तोच ओळखला जातो. चॅनल व्ही च्या शो 'मस्तांगी' मध्ये त्याने प्रतिपक्षाची व्यक्तिरेखा साकारली होती.