Join us  

विकी कौशलसोबतच्या नात्याबाबत हरलीन सेठीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 5:01 PM

विकी कौशलचे हरलीन सेठीसोबत अफेयर असल्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे.

ठळक मुद्देविकी कौशलने गायले होते हरलीन सेठीसाठी गाणं

गेल्या काही दिवसांपासून विकीसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड हरलीन सेठी दिसतोय. दोघे फोटोग्राफर्ससमोर देखील बिनधास्त वावरताना दिसतात. विकी आणि हरलीनने अद्याप आपले नाते सर्वाजनिकपणे स्वीकारले देखील नाही. मात्र विकीने सोशल मीडियावर कथित लव्ह स्टोरीबाबतची हिंट दिली होती. विकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात हरलीन सेठी आणि विक्रांत मेस्सी दिसत आहेत. या फोटोसोबत विकीने लिहिले आहे की, ''मेरे दो अनमोल रतन.'' या फोटोवरुन विकी आणि हरलीनमधले नात्यामध्ये खास कनेक्शन असल्याचे दिसते. या नात्याबाबत आता खुद्द हरलीन सेठीने खुलासा केला आहे.

हरलीन सेठीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. विकी कौशलने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हरलीन सेठीसाठी दलजीत दोसांझचे सुपरहिट गाणे मैं तेनु किन्ना प्यार करा गायले होते. रिपोर्टनुसार विकी आणि हरलीनची ओळख त्यांचा कॉमन फ्रेंड आनंद तिवारीमुळे झाली. त्यानंतर ते एकमेकांना आवडू  लागले. प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर हरलीनची नुकतीच 'ब्रोकेन बट ब्यूटीफुल' ही वेबसीरिज दाखल झाली आहे. या वेबसीरिजच्या लाँचिंगला विकी कौशलनेदेखील हजेरी लावली होती.

विकी उरी सिनेमात दिसणार आहे. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. 11 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :विकी कौशल