Join us  

'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 3:24 PM

विकी जसाजसा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला तशी हरलीनची ओळख विकीची EX अशीच बनली.

अभिनेत्री हरलीन सेठी (Harleen Sethi) 'ब्रोकन बट ब्युटीफूल' सीरिजमुळे लोकप्रिय झाली. या सीरिजने तिला अनेक चाहते मिळाले. नंतर तिने अनेक सीरिज, काही सिनेमेही केले. अनेकांना माहित असेल की हरलीन सेठी ही विकी कौशलची (Vicky Kaushal) एक्स गर्लफ्रेंड आहे. विकी जसाजसा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला तशी हरलीनची ओळख विकीची EX अशीच बनली. आता हरलीन सेठीने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत हरलीन सेठी म्हणाली, "माझ्या इन्स्टाग्राम बायोमध्ये सुद्धा I AM हे दोनच शब्द आहेत. पुढे काहीच नाहीए. मला एकंदरच कशाचीही ओळख सांगण्यात प्रॉब्लेमच आहे. मी स्वत:ला अभिनेत्रीही म्हणणार नाही. कारण माझी ओळख ही काहीही असू शकते. मी मुलगी आहे, अभिनेत्री, बहीण, मैत्रीण, आत्मविश्वासू, निडर महिला किंवा घाबरलेली महिला यापैकी काहीही असू शकतं. मी आहे I AM एवढंच."

हरलीन सेठीच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. 'अरे कहना क्या चाहते हो?' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. हरलीन सेठीचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. विकी कौशलच्या संघर्षाच्या काळात तो हरलीनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र 'उरी' च्या यशानंतर विकी खूप पुढे गेला आणि हरलीन मागे राहिली. कालांतराने त्यांचं नातं तुटलं. 

हरलीन सेठीने 'ब्रोकन बट ब्युटिफूल' शिवाय 'कोहरा','बॅड कॉप' या सीरिजमध्येही काम केलं. तर विकी कौशलचा 'बॅड न्यूज' नुकताच रिलीज झाला.

टॅग्स :हरलीन सेठीविकी कौशलबॉलिवूडरिलेशनशिपसोशल मीडिया