Join us

कतरिना व विकी सोबत आहेत आणि हे सत्य आहे...! हर्षवर्धन कपूरने कन्फर्म केली ‘लव्हस्टोरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:46 PM

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. आता...

ठळक मुद्दे‘कॉफी विद करण’ या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. सध्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला आहे. गतवर्षी दिवाळी पार्टीत कॅट आणि विकी पहिल्यांदा कॅमे-यांत कैद झाले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. अर्थात अद्याप कतरिना यावर काही बोलली, ना विकी. पण तरिही बोभाटा झालाच. आता काय तर अभिनेता हर्षवर्धन कपूर (Harsh Varrdhan Kapoor) यानेच कॅट व विकीचे रिलेशनशिप कन्फर्म केले आहे.  (Vicky Kaushal Katrina dating)

झूमवर एका चॅट शोदरम्यान हर्षवर्धन जे बोलायला नको होते ते बोलून बसला. इंडस्ट्रीतील रिलेशनशिपच्या चर्चा ख-या असतात की खोट्या?, असा प्रश्न त्याला केला गेला. यावर हर्षवर्धनने अचानक विकी व कॅटचे नाव घेतले. ‘विकी व कतरिना सोबत आहेत आणि हे सत्य आहे,’ असे तो म्हणाला. विशेष म्हणजे यानंतर लगेच ‘क्या यह बताकर मैं मुसीबत में पडने वाला हूं?’, असे तो म्हणाला.

आता हर्षवर्धन अडचणीत येणार की नाही, हे आम्हाला माहित नाही. पण हर्षवर्धनने एक लव्ह स्टोरी कन्फर्म केलीये, हे मात्र नक्की आहे.अलीकडे विकी कौशल कतरिनाच्या घरी दिसला होता. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ई टाईम्सने हा व्हिडीओ शेअर केला होता.  2019 मध्ये अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते.  पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता . हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता. 

‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता.‘कॉफी विद करण’ या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल