Join us  

बहिणीच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भाऊ हर्षवर्धन कपूरने रस्त्यावर वाटली मिठाई, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 4:01 PM

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी आज साताजन्माच्या गाठी बांधल्या. दोघांच्या या लग्नाचा आनंद कपूर आणि आहुजा परिवाराकडून साजरा केला जात आहे.

आज सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा विवाह संपन्न झाला. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोनमच्या मावशीच्या बंगल्यात हा विवाह सोहळा पार पडला. कपूर परिवारातील जवळपास प्रत्येक सदस्य सध्या सोनमच्या लग्नाचे फोटोज् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. जेणेकरून चाहत्यांना प्रत्येक क्षणाची माहिती मिळावी. दरम्यान, सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर याचा एक व्हिडीओ सध्या समोर येत असून, त्यामध्ये तो बहिणीच्या लग्नाचा आनंद म्हणून रस्त्यावर मिठाई वाटताना दिसत आहे.  हा व्हिडीओ स्वत: हर्षवर्धनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रस्त्यावर मिठाईचे डब्बे वाटताना दिसत आहे. हर्षवर्धन ज्या पद्धतीने हे मिठाईचे डब्बे देत आहे, त्यावरून तो माध्यम प्रतिनिधी आणि घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना देत असावा असेच दिसून येते.  गेल्या चार-पाच दिवसांपासून माध्यम प्रतिनिधी सातत्याने सोनमच्या लग्नाच्या बातम्या आणि व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवित आहे. अशात कपूर परिवाराकडून त्यांना मिठाईचे डब्बे देण्यात आले असावेत. दरम्यान, सोनम कपूर आणि आनंदचा विवाह पार पडल्यानंतर सध्या या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन सुरू आहे. मुंबईतील द लीला हॉटेलमध्ये रिसेप्शन पार पडणार आहे. रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे.