Sanam Teri Kasam: अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane ) आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन (Mawra Hocane) यांचा रोमँटिक चित्रपट 'सनम तेरी कसम' सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच व्हॅलेंटाईन वीक लक्षात घेऊन हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर 'सनम तेरी कसम' ब्लॉकबस्टर कलेक्शनसह पुढे जात आहे. ९ वर्षांपूर्वी 'सनम तेरी कसम' चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. मात्र, आता या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलं आहे. जर तुम्हालाही हा चित्रपट पहायचा असेल आणि थिएटरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
'सनम तेरी कसम' पुन्हा एकदा पाहण्यासाठीत तुम्हाला थिएटरमध्ये जावेच लागेल, असं नाही. तुम्ही घरबसल्यादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Sanam Teri Kasam OTT Release) हा चित्रपट मोफत पाहू शकता. 'सनम तेरी कसम' चे ओटीटी हक्क प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओकडे आहेत. पण, जेव्हा पुन्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्यावर तो अमेझॉन प्राइम व्हिडीओवरुन हटवण्यात आला. पण तरीही तुम्ही 'सनम तेरी कसम' ऑनलाइन मोफत पाहू शकता.
जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा उपलब्ध आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 'सनम तेरी कसम'पेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण, कथेवर आधारित चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला होता. पुन्हा प्रदर्शित होण्यापूर्वी, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली होती. आता जेव्हा 'सनम तेरी कसम' पुन्हा प्रदर्शित झाल्यावर त्याला मिळालेलं बंपर यश पाहता निश्चितच या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येऊ शकतो. सिक्वेलमध्ये हर्षवर्धन राणे मुख्य अभिनेता असेल.पण, अभिनेत्रीबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.