अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. पण नात्यावर बोलण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही चुप्पी साधली. पण आता हर्षवर्धनने किमवरील आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. किम शर्मा तर कधीचीच बॉलिवूडमधून गायब झाली आहे. ‘मोहोब्बते’, ‘नहले पे दहला’, ‘मनी है तो हनी है’, ‘कुडियों का है जमाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली किम काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली.
'सनम तेरी कसम' या चित्रपटात हर्षवर्धनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मात्र, बॉलिवूडमधील त्याचे करिअर तितके यशस्वी राहिले नाही. किम शर्माच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. 'मोहोब्बते', 'नहले पे दहला', 'मनी है तो हनी है', 'कुडियों का है जमाना', 'जिंदगी रॉक्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली किम काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. मात्र, आता या रिलेशनशिपमुळे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.