Join us

कधीकाळी हर्षवर्धन राणेनं जॉन अब्राहमचं हेल्मेट डिलिव्हर केलं होतं; आता त्याच्याच सिनेमात बनणार हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:30 IST

हर्षवर्धन राणे कधी काळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ‘तैश’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये हर्षवर्धनने हा किस्सा सांगितला होता.

ठळक मुद्दे‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

‘सनम तेरी कसम’ या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे ( Harshvardhan Rane) डेब्यूनंतर काही काळ अचानक गायब झाला होता. पण आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जोमात कामाला लागला आहे. एकापाठोपाठ एक अशा नव्या प्रोजेक्टवर त्याचे काम सुरू आहे. अलीकडे तो तापसी पन्नूसोबत ‘हसीन दिलरूबा’ या सिनेमात दिसला. आता लवकरच जॉन अब्राहमची (John Abraham) निर्मिती असलेल्या एका सिनेमात त्याची वर्णी लागली आहे.

हर्षवर्धन राणे कधी काळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ‘तैश’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये हर्षवर्धनने हा किस्सा सांगितला होता. ‘चित्रपटात येण्याआधी मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होतो. तेव्हा मी जॉन अब्राहमचे हेल्मेट डिलिव्हर केले होते. ती त्याची माझी पहिली भेट होती. ही 2004 ची गोष्ट. अर्थात आपल्याला जॉन भेटणार, हे मला ठाऊक नव्हते. मी हेल्मेटची डिलिव्हरी घेऊन पोहोचलो, तेव्हा समोर जॉन होता. जॉनने खूप प्रेमाने माझे आभार मानले होते. जॉन आपल्याला भेटला, त्याने आपल्याला थँक्यू म्हटले, यामुळे मी सुद्धा अक्षरश: हवेत होतो.’

यानंतर हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केला होता. आता काय तर जॉनच्या सिनेमातच काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

टॅग्स :हर्षवर्धन राणेजॉन अब्राहम