Join us

गायक राजू पंजाबी यांचं निधन, ४० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, सपना चौधरीसोबत प्रसिद्ध होती जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:36 AM

हरियाणवी गायक राजू पंजाबी यांचं सोमवारी रात्री निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

हरियाणवी गायक राजू पंजाबी यांचं सोमवारी रात्री निधन झाले. ते  40 वर्षांचे होते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर हिस्सार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.  त्यांना कावीळ झाली होती. त्यामुळे यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी रावतसर खेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  सध्या ते आझादनगर, हिसार येथे राहत होता. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चाहते हिस्सारला पोहोचले.. त्यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला आहे.

राजू पंजाबी यांट्यावर हिसार येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ते बरे होऊन घरी गेले, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू पंजाबी विवाहित आहे. त्यांना ३ मुली आहेत.

 सॉलिड बॉडी, चंदन, तू चीज लाजवाब, देसी-देसी अशी त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. सपना चौधरीसोबतची त्यांची जोडी खूप गाजली होती. हरियाणातील संगीत उद्योगाला त्यांनी एक नवी ओळख दिली. हरियाणवी गाण्यांना नवी दिशा दिली. राजू पंजाबीचे शेवटचे गाणे १२ ऑगस्टला रिलीज झाले. मात्र, यादरम्यान त्यांना रुग्णालयातच दाखल करण्यात आले. आपसे मिलेके यारा हमको अच्छा लगा था या शेवटच्या गाण्याचे बोल. हे गाणे तयार करण्यासाठी 2 वर्षे लागली.

टॅग्स :सपना चौधरी