बॉलिवूड स्टार्सच्या लुकची, चित्रपटांची, त्यांच्या पर्सनल लाईफची चर्चा होते, तशीच त्यांच्या प्रॉपर्टीचीही चर्चा होतान दिसते. सध्या चर्चा आहे ती अक्षय कुमार (Akshay Kumar) व हृतिक रोशनची ( Hrithik Roshan). होय, हृतिक रोशनचं जुहूतील अलिशान घर अक्षय कुमारने खरेदी केल्याचं कळतंय. याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, डील फायनल झाली आहे.सुझैन खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक जुहूतील पलाजो अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला होता. याठिकाणी तो आपल्या आई-बाबांसोबत राहत होता. अलीकडे तो जुहू वर्सोवा येथील ‘मन्नत’ अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. आता या अपार्टमेंटचं ‘वर्तमान’ असं नामकरण झालं आहे.
हृतिक जुहूतील पलाजो अपार्टमेंट सोडणार असतानाच अक्षय कुमारने त्याचं हे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चर्चा खरी मानाल तर अक्षयने ही डील फायनल केली आहे.अर्थात याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.हृतिकचा जुहू भागातील घर त्याच्या नानाजींचं म्हणजे जे. ओमप्रकाश यांचं आहे. या प्रॉपर्टीची मालकी हृतिकची आई पिंकी रोशन यांच्याकडे आहे. अलीकडे हे घर विकणार असल्याची बातमी समोर आली आहे. अर्थात हृतिकला हे घर विकायची इच्छा नव्हती. कारण या घरासोबत हृतिकच्या अनेक भावना जुळलेल्या होत्या. नानांच्या अनेक आठवणी या घराशी जुळलेल्या होत्या. त्यामुळे हृतिक या घराची डील करू शकला नव्हता.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आज 30 सप्टेंबरला हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. हृतिक त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. सुजैननंतर त्याच्या आयुष्यात सबा आझादची एन्ट्री झाली आहे. अनेकदा तो सबासोबत दिसतो. दोघांचही नातं आता लपून राहिलेलं नाही.अक्षय कुमारच्या कामाबद्दल तर सांगायची गरजच नाही. त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. रामसेतू, सेल्फी, ओएमजी 2, कॅप्सुल गिल असे त्याचे अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.